श्री. सुधीर मुनगंटीवार,
मा. मंत्री वने, सांस्कृतिक कार्य,
व मत्स्यव्यवसाय विभाग
![]() श्री. सुधीर मुनगंटीवार, |
![]() डॉ. अतुल पाटणे, (भा.प्र.से.) |
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हा महत्वाचा स्त्रोत आहे. विभागाचा उददेश आर्थिक मागासवर्गास मदत करणे आणि मत्स्यव्यवसायाच्या विविध क्षेत्रात आधुनिक प्रामाणित तंत्रज्ञान आत्मसात करुन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे हा विभागाचा उददेश आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रामुंळे आर्थिक मागासवर्गीयांस रोजगार, स्वस्त व पोषक अन्न, उपलब्ध होते तसेच देशाला परकीय चलन प्राप्त होते. विभागाने विविध साधनसंपत्ती पध्दती, संधी, संभाव्य धोके इत्यादी बाबीं लक्षात घेऊन भविष्यासाठी धोरण निश्चित केले आहे. विभागाचे धोरण पुढील प्रमाणे आहे.